Connect with us

टेक

E-Aadhar Card Download कसे करायचे? | How to download e-Aadhar Card?

Published

on

E-Aadhar Card Download कसे करायचे? | E-Aadhar Card Download in marathi | How to download e-Aadhar Card?E-Aadhar Card Download कसे करायचे?

मित्रानो, आपण सरकारी किंवा प्रायवेट कोणतेही काम करत असताना आपल्याला आपली ओळख म्हणून आपले ओळखपत्र दाखवणे गरजेचे असते. आधार कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांमधील एक मानले जात।  ओळखपत्रांमध्ये सर्वात महत्वाचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. सरकारने आधार कार्ड हे भारतातील सर्व नागरिकांसाठी महत्वाचे आहे असे सांगितलेले आहे आणि ते गरजेचे हि आहे. 

आपले एखादे महत्वाचे तात्काळ काम असेल आणि आपले ओळखपत्र म्हणजेच आपले आधार  कार्ड जर मिळत नसेल किंवा ते हरवले असेल तर आपले काम अडकून राहण्याची शक्यता असते, आणि जर आपल्याला आधार कार्ड परत मिळवायचे असेल तर आपल्याला सारखे सारखे आधार सेंटरला जावे लागते आणि त्या मध्ये खूप उशीरही लागतो, तसेच त्यामुळे आपले कामांना ही उशीर होतो.

E-Aadhar Card Download कसे करायचे?
E-Aadhar Card Download कसे करायचे?

परंतु, आता आपण ई – आधार कार्ड कधीही कुठेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाइल फोन मध्ये काढू शकतो तेही अगदी कमी वेळेत. ई – आधार कार्ड ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करण्याचा मार्ग अगदी सोपा करण्यात आला आहे. देशातील ज्या लोकांनी आपले आधार कार्ड काढण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (UIDAI) अर्ज केला आहे, परंतु ते आधार कार्ड त्या लोकांना अद्याप आलेले नाही किंवा ते आधार कार्ड कुठेतरी हरवले आहे, तर तुम्ही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे अर्ज करू शकता. तुम्ही तुमचे आधार कार्ड त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सहजपणे डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता. आधार कार्ड वर 12 अंकी क्रमांक असतो जो युनिक आयडेंटिफिकेशन थॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI ) ने जारी केला आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात ई आधार डाउनलोड ऑनलाईन कसे करायचे ते सांगणार आहोत. म्हणून आमचा लेख काळजीपूर्वक वाचा.

E-Aadhar Card Download कसे करायचे?

जेव्हा तुम्ही आधारसाठी अर्ज करता तेव्हा आधार प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण १५ दिवस लागतात. यशस्वी पडताळणीनंतर, तुमचा अर्ज UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या द्वारे मंजूर केला जातो आणि त्याचे अपडेट तुमच्या मोबाईलवर येते. तेव्हाच तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना त्यांचे ई आधार कार्ड डाउनलोड करायचे आहे ते घरी बसून डाउनलोड करू शकतात. इंटरनेटद्वारे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन ते आधार कार्ड अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करून तुम्ही कोणत्याही कामात त्याचा वापर करू शकता. आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे डाउनलोड करावे हे आम्ही खाली दिले आहे.

ई – आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) ने त्यांच्या ट्विटर प्रोफाइल वर ई – आधार कार्ड डाउनलोड ओंलीने पद्धतीने करण्यासाठी डायरेक्ट लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे ई – आधार कार्ड अगदी कमी वेळेत आणि सहजरित्या डाउनलोड करू शकता.त्याचप्रमाणे तुम्ही ट्विटर वरील युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) यांच्या अधिकृत प्रोफाइल वर न जाताही आपल्या मोबाइलला मधून गूगल वरती जाऊन त्या वेबसाइट ला जाऊ शकता.

https://eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता व ते कुठेही त्याचा ओळखपत्राच्या  स्वरूपात वापरू शकता.

खालील दिलेल्या स्टेप्स च्या मदतीने तुम्ही तुमचे ई – आधार कार्ड डाउनलोड करू शकता

१) सर्वप्रथम, तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइट (https://eaadhaar.uidai.gov.in/) वर क्लिक जावे लागेल.

) ) २) अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) चे मुख्यपृष्ठ म्हणजे होम पेज उघडेल.

३) या होम पेजवर तुम्हाला ई – आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी लॉगिन करण्याचा पर्याय दिलेला असेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

४) तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर प्रविष्ट करावा लागेल.

५) तुम्ही आधार नंबर प्रविष्ट केल्या नंतर त्याच्या खाली तुम्हाला दिलेला कॅप्चा टाकून सेंड ओटीपी (Send OTP) या बटनावर क्लिक करावे लागेल.

६) तुमच्या आधार कार्ड ला तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे.

७) तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी (Enter OTP) या मध्ये टाकून लॉगिन या बटनावर क्लिक करा.

८) त्यानंतर तुम्ही तुमच्या लॉगिन केलेल्या आधार च्या होम पेज वर डाउनलोड आधार (Download Adhar) या बॉक्स वर क्लिक करा.

९) पुढे खाली स्क्रोल केल्या नंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचे फोटो, नाव, वय, लिंग आणि पत्ता असेल.

१०) त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली बॅक (Back) आणि डाउनलोड (Download) असे दोन बटन दिसेल तेव्हा तुम्हाला तिथे डाउनलोड (Download) या बटनावर अर्थात पर्यायावर  क्लिक करायचे आहे. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे ई – आधार कार्ड डाउनलोड.

तुम्हाला तुमचे ई – आधार कार्ड PDF फॉरमॅट मध्ये मिळेल. तुम्हाला ती फाईल ओपन करण्यासाठी तुमच्या सिस्टममध्ये (कॉम्पुटर किंवा मोबाइल) फाइल सपोर्ट करणारे सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. 

ई – आधार कार्ड पासवर्ड

तुम्ही डाउनलोड केलेले ई – आधार कार्ड पासवर्ड प्रोटेक्टड असेल. तुमचे ई – आधार कार्ड ओपन करण्यासाठी पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले ४ अक्षर आणि तुमच्या जन्मतारखेचे वर्ष सर्व कॅपिटल लेटर (CAPITAL LETTER) आणि वर्ष (YYYY) या स्वरूपात प्रविष्ट करावे. पासवर्ड प्रविष्ट केल्या नंतर तुम्हाला डाउनलोड केलेले तुमचे ई – आधार कार्ड दिसेल आणि ते तुम्ही कुठेही तुमच्या ओळखपत्राचा स्वरूपात वापरू शकतात.

उदा. तुमचे नाव Shubham Kishor Tandalkar आहे आणि जन्म वर्ष 1980 आहे.

तर तुमचा ई – आधार कार्ड चा पासवर्ड- SHUB1980 असा असेल.

तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बद्दल काही तक्रार करायची असेल तर खाली दिलेल्या माहितीनुसार युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत नंबर  वर आणि ई-मेल वर त्यांच्याशी संपर्क साधून निवारण करू शकतात.

Contact Number UIDAI :

Toll-Free Number – 1947

Email ID – emailhelp@uidai.gov.in

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.