Connect with us

टेक

Blockchain म्हणजे काय? Blockchain meaning in marathi

Published

on

Blockchain म्हणजे काय?

Blockchain म्हणजे काय? Blockchain meaning in marathi, Blockchain Technology 

 आज आपण Blockchain या संकल्पना विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. Blockchain म्हणजे काय? Blockchain meaning in marathi, Blockchain Technology. 

      गेल्या काही काळा पासून आपण Blockchain हा शब्द खूप सर्रास ऐकत आलेलो आहोत पण बहुतेक जणांना अजूनही Blockchain नेमकी काय आहे हे माहीत याचा अंदाज नसणार. ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे रूपांतर digital स्वरुपात केले जाते आणि त्याचा data जतन करून ठेवला जातो. 

Blockchain meaning in marathi

Blockchain हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. पाहिलं शब्द ब्लॉक (Block) आणि दुसरा चैन (Chain) म्हणजे साखळी. ब्लॉक याचा अर्थ Blockchain system मधे data साठवण्यासाठी असलेले ब्लॉक्स. या ब्लॉक्स मधे crypto currency चा data साठवला जातो. 

Blockchain म्हणजे काय? 

     जसं की आपण पाहिले की Blockchain म्हणजे data साठवण्यासाठी असलेले ब्लॉक्स असतात.   

        ब्लॉकचेन हा एक प्रकारचा database आहे. या डेटाबेसमध्ये information आणि data सारणीच्या स्वरूपात संग्रहित केला जातो. 

         हे तंत्रज्ञान सर्वात प्रथम 1991 मध्ये Stuart Haber आणि W. Scott Stornetta यांनी जगासमोर आणले. परंतु याचा शोध लागून सुद्धा Blockchain ला त्याचे पहिले application 2009 साली मिळाले जेव्हा Bitcoin लाँच झाले. 

          याला Blockchain असे नाव यामुळे देण्यात आले कारण हे तंत्रज्ञान data ला गटांमध्ये गोळा करत असते आणि याच गटांना ब्लॉक्स असे संबोधित केले गेले आहे. प्रत्येक ब्लॉक ची एक मर्यादित स्टोरेज क्षमता limited storage capacity असते. 

            जेव्हा एका ब्लॉक ची ही storage capacity भरल्या नंतर तो पहिल्या ब्लॉक सोबत जोडला जातो. हीच प्रक्रिया पुढे सातत्याने चालू राहते आणि असे अनेक ब्लॉक्स मिळून एक chain तयार होते. याच साखळीला Blockchain असे म्हंटले जाते. 

Blockchain कसे कार्य करते ? 

            आता पर्यंत आपण Blockchain म्हणजे काय? याबद्दल माहिती घेतली. आता Blockchain कार्य कसे करते याचा सविस्तर आढावा घेऊयात. 

       Blockchain ही साखळी अशा blocks ची मिळून तयार होत असते ज्या ब्लॉक्स मध्ये data पुर्णपणे भरलेला असतो. प्रत्येक block मध्ये आपल्या मागील ब्लॉकची क्रिप्टोग्राफी हॅश Cryptography Hash असते. हा hash प्रत्येक transaction वर generate होत असतो. जो की numbers आणि letters च्या strings चा मिळून बनलेले असतात. 

        जर ह्या Blockchain मधील data सोबत कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला किंवा system ला तसे काही संकेत जरी मिळाले तर हा पूर्ण data बदलत राहतो. आणि ह्याच मुळे यंत्रणेत झालेली अगदी छोटी हेराफेरी सुद्धा लगेच लक्षात येते. या मुळेच Blockchain Technology ला सर्वात सुरक्षित technology पैकी एक मानले जाते. 

            प्रत्येक संगणकाकडे Blockchain ची एक कॉपी असते. ज्याला nodes असे म्हंटले जाते. transaction मध्ये काही बदल झाला आहे का हे शोधण्यासाठी हे nodes ब्लॉक्स मधील hash तपासत असतात.

        ही ब्लॉकचेन दर 10 मिनिटांनी स्वतः ला update करत राहते. यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक व्यवहाराची detail उपलब्ध असते.

जर transaction हे बहुतेक nodes द्वारे approved केले गेले असेल. तर ते block मध्ये लिहिले जाते.  

Blockchain आणि Bitcoin मधील संबंध

         Bitcoin च्या प्रत्येक transaction store करून ठेवण्यासाठी Blockchain हे एक प्रकरचे database आहे.बिटकॉईन सारख्या cryptocurrency या थेट Blockchain मार्गात computer वर spread केल्या जातात. आणि ह्याच मुळे currencies कोणत्याही authority शिवाय operate केल्या जाऊ शकतात. ह्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवहारात केल्याने व्यवहार अधिक सुलभ, सोईस्कर आणि फायद्याचा होत आहे. 

          Cryptocurrency व्यतिरिक्त देखील health sector, banking industry आणि इतर बऱ्याच ठिकाणी Blockchain technology वापरली जात आहे. 

या पोस्ट मधे आपण Blockchain या संकल्पना विषयी सविस्तर माहिती घेतली आहे. त्या मधे आपण पहिले Blockchain म्हणजे काय? Blockchain meaning in marathi, Blockchain Technology. 

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.