Connect with us

बिझनेस आयडिया

Business ideas in marathi | मराठी बिझनेस आयडिया। कमी गुंतवणूकीचे व्यवसाय 

Published

on

Business ideas in marathi मराठी बिझनेस आयडिया आजकाल सर्वांना स्वतः चा व्यवसाय हवा आहे, सर्व लोकांना वाटते की एखादा असा व्यवसाय सुरू करावा ज्या मधे गुंतवणूक कमी परंतु नफा जास्त मिळावा. ज्यांना खरंच व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना कमी गुंतवणूक करून बिझनेस कसा उभा करायचा याची कल्पना च नसते. लोकांना वाटते की बिझनेस म्हणजे खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार पण असे बरेच लोकं आहेत ज्यांना कमी पैशातून बिझनेस उभारून खूप मोठा नफा कमवत आहेत. आजच्या आपल्या ह्या पोस्ट मधे आपण बघणार आहोत Business  ideas  in marathi. 

Business ideas in marathi

       जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस सुरू करावयाचा असेल तर त्याला पुरेशी रक्कम तर लागतेच पण त्याच सोबत लागते योग्य ते नियोजन, बिझनेस मधे जेवढे महत्त्व पैश्याला आहे त्याच्या किती तरी पटीने जास्त महत्वाचे आहे चांगले नियोजन. याचा अर्थ असा नाही की आपण कमी पैशात बिझनेस उभा करू शकत नाही. आपण या पोस्ट मधे हेच बघणार आहोत की कमी रकमेत स्वतः च व्यवसाय कसा सुरू करावा. 

Small Business ideas In Marathi 

Online Marketing 

  •        हा एक उत्तम पार्ट टाईम, कमी गुंतवणुकीचा आणि घरघुती लघु उद्योग आहे. स्त्रियां साठी सुध्दा हा एक उत्तम घरघुती व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायात ऑनलाइन मार्केटिंग द्वारे, म्हणजे Whatsapp, इंस्टाग्राम, ट्विटर या प्लॅटफॉर्म्स वर तुमच्या आहे त्या followers ला रोजच्या वापराच्या वस्तू, किराणा, कपडे किंवा इतर कोणत्याही वस्तू ज्या तुम्ही ऑनलाइन विकू शकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवून त्या वस्तूंची मार्केटिंग करून विकू शकतात.
  • यामधे फायदा असा आहे की या व्यवसाय साठी तुम्हाला पैसे लावावे लागत नाहीत किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा भरमसाट साठा करण्याची ही आवश्यकता नाही. ऑर्डर मिळाल्या नंतर तुम्ही ती वस्तू घेऊन आपला नफा काढू शकता. अश्या प्रकारे आपण एखादी मोठी गुंतवणूक न करता घरबसल्या पैसे कमवू शकता. 

ब्लॉगींग मधून पैसे कमवा 

  • जर तुम्हाला ब्लॉगींग मधून पैसे कमवायचे असतील तर अंतर्गत ब्लॉगींग बद्दल माहिती असणे फार आवश्यक आहे. जर तुमच्याकडे internet बद्दल पुरेशी माहिती आणि लिहण्याचे कौशल्य असेल आणि तुमच्या कडे मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही प्रती माह लाखो कमवू शकता. दोन वर्षापूर्वीच काढलेली एखादी वेबसाइट आजच्या तारखेला 80 हजार रुपये इतके उत्पन्न देऊ शकते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही Part time job म्हणून हा व्यवसाय करू शकता. 
  • यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, त्यानंतर जर तुम्ही वर्डप्रेस वर वेबसाइट बनवत असाल तर होस्टिंग आवश्यक असेल. ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला ज्ञान आहे, म्हणजे कोणत्या क्षेत्रात तुम्हाला लिहायला आवडेल तो विषय निवडा.

यूट्यूब वरून कमवा पैसे 

  • आजकाल आपण सर्व जण बघतोय की बरेच लोकं ऑनलाईन पैसे कमवत आहेत. यूट्यूब वरून सुद्धा अशेच ऑनलाईन पैसे कमवता येतात आणि ज्यांनी पहिल्यांदा ऐकायला मिळत आहे हे त्यांच्या साठी हा एक नवीन व्यवसाय आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओज बनवून आपल्या स्वतः च्या यूट्यूब चॅनल वर अपलोड करायचा आहे. जर तुम्ही एका वर्षात ४००० तासांचा वॉच टाइम आणि १००० सबस्क्राइबर पूर्ण केलेत, तर तुमचे व्हिडिओ पैसे कमवण्यास पात्र होतात. हा एक उत्तम ऑनलाईन घरघुती व्यवसाय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी आहे. 

फ्रीलांसर व्हा 

  • फ्रीलांसर हा व्यवसाय 21 व्यां शतकातील सर्वात यशस्वी व्यासायांपैकी एक आहे. हा एक बिनभांडवलि घरघुति व्यवसाय आहे. आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत ज्या लोकांना ऑनलाईन काम करायला लावतात आणि लोक ऑनलाइन कामाच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतात, अशा काही कंपन्या आहेत ज्याद्वारे तुम्ही घरूनही काम करू शकता. जर तुम्हाला वेबसाईट डिझायनिंग, आर्टिकल रायटिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फोटो आणि व्हिडीओ एडिटिंग, यूट्यूब thumbnail इत्यादी मधे रस असेल तर याच प्रकारचे किंवा हेच कामे तिथे उपलब्ध असतात. 
  • इथे काम करण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही हे काम कधी ही हवे तेव्हा करू शकता. शिवाय आपल्या कामाचे पैसे, मोबदला  तुम्ही स्वतः ठरवू शकता. हा एक यशस्वी part time job आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही काम करून चांगले पैसे कमवू शकता. 

रिअल इस्टेट कन्सल्टन्सी 

  •   स्थावर मालमत्तेवर गुंतवणूक करणे हा सर्वात फायदेशीर विचार आहे कारण एखादी व्यक्ती जितके कमवणार तितकेच ती व्यक्ती गुंतवणूक करते. आणि अश्याच एखाद्या व्यक्तीने आपली मालमत्ता कोणत्या रिअल इस्टेट कन्सल्टन्सी च्या मदतीने घेतली तर तो त्या फर्म ला मालमत्तेच्या कमिटीच्या १% किंवा २% देतो, जी की अर्थातच खूप चांगली रक्कम असते. 
  • सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही रिअल इस्टेट फर्म सुरू करण्यासाठी गुंतवणूकीची रक्कम खूप कमी आहे, किंवा अजिबात इन्व्हेस्टमेंट नाहीये. तुमच्या चांगल्या ओळखी असतील तरीही हा बिजनेस यशस्वी होऊ शकतो.

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.