Connect with us

टेक

Crypto currency काय आहे ? Crypto currency in marathi, Cryptocurrency फायदे – तोटे 

Published

on

Crypto currency काय आहे?

Crypto currency काय आहे? Crypto currency in marathi, Cryptocurrency फायदे – तोटे 

      जगातील कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि देश यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी आणि परस्पर व्यवहारांना चालना देण्यासाठी एका विशिष्ठ चलन ( Currency) ची आवश्यकता आहे ज्याने करून हे सर्व व्यवहार आणि त्यांचा वापर सुरळीत पणे करत येईल. म्हणूनच  आपण बघतो की प्रत्येक स्वतंत्र राष्ट्राचे एक विशिष्ट चलन आहे, जसं की भारतातील चलन म्हणजे रुपया, अमेरिकेचा डॉलर इत्यादी वास्तविक, हे भौतिक चलन तुम्ही देशाच्या नियमांनुसार कोठेही पाहू शकता, स्पर्श करू शकता, त्याचा वापर देखील करू शकता. परंतु crypto चलन हे डिजिटल चलन आहे हे बाकी चलनांपेक्षा वेगळे आहे. तुम्ही ते पाहू शकत नाही, स्पर्श देखील करू शकत नाही परंतु त्याचा वापर करू शकता. Crypto चलन हे भौतिक स्वरूपात छापलेले च नाही, म्हणूनच याला आभासी चलन म्हणतात. गेल्या काही वर्षात हे खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा झाले आहे. 

            आज आपण ह्याच crypto चलाना विषयी माहिती घेणार आहोत. Crypto currency काय आहे? ह्याची पूर्ण माहिती आपल्याला ह्या पोस्ट मधे मिळेल. 

Crypto currency काय आहे ?

         Crypto हे चलन संगणकाचा उपयोग करूनच एका खास अल्गोरीथम ने बनवले जाते. हे चलन कोणत्याही एका प्राधिकरणाच्या मालकीचे नाही. हे चलन म्हणजे मालक नसलेले एक विनामूल्य चलन आहे. आपल्याला माहीत असलेल्या रुपया, डॉलर, युरो किंवा इतर चलनांप्रमाने हे चलन कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा कोणत्याही राष्ट्राच्या सरकारच्या नियंत्रणाखाली किंवा कोणत्याही सरकार द्वारे चालवले जात नाही.  

           हे एक डिजिटल चलन आहे ज्याच्या साठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. शिवाय कोणत्याही वस्तू खरेदी साठी किंवा कोणत्याही सेवा खरेदी साठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

            साल 2009 मधे सर्वात प्रथम crypto currency सादर करण्यात आली होती, सर्वात पहिली सादर झालेली cryptocurrency  बिटकॉइन ही आहे. हे crypto चलन जपानच्या एका अभियंत्याने बनविले होते ज्यांचे नाव सतोषी नाकमोतो  असे आहे. सुरुवातीच्या काळात हे चलन जास्त लोकप्रिय नव्हते परंतु हळू हळू याची प्रसिध्दी आणि याचे दर गगनाला भिडले आणि हे चलन यशस्वीरीत्या काम करू लागले. 

        याच cryptocurrency ला डिजिटल चलन देखील म्हंटले जाते. ही एका प्रकारची डिजिटल asset आहे. याचा वापर करून वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या जाऊ शकतात. हे एक Peer to Peer Electronic System आहे ज्याचा वापर Internet च्या माध्यामातून regular currencies ऐवजी Goods आणि Services purchase करण्यासाठी करता सुद्धा करता येत. या प्रणालीच्या माध्यमातून सरकार बँकांना न कळवता देखील व्यवहार करू शकते. ह्याच मुळे काही लोकांचा स देखील समाज आहे की ह्याच वापर चुकीच्या मार्गाने सुद्धा केला जाऊ शकतो. 

           आज आपण crypto currency चा आढावा घेतला तर जगभरात 1000 हून अधिक क्रिप्टोकरन्सी आहेत. असे जरी असले तरी यामधले काहीच महत्त्वपूर्ण आहेत. 

Cryptocurrency मध्ये गुंतवणूक  कशी करावी?

         आता पर्यंत आपण crypto currency काय आहे हे पाहिलं. आता या मधे गुंतवणूक कशी करावी या विषयी माहिती घेऊयात. 

          योग्य व्यासपीठ निवडून cryptocurrency मध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा ही कमवू शकता. योग्य ते व्यासपीठ नाही निवडले तर तुम्हाला ट्रेडिंग करताना काही अतिरिक्त शुल्क भरावा लागु शकतो.  सध्या भारतातील सर्वात लोकप्रिय cryptocurrency व्यासपीठ म्हणजे Wazirx हे आहे. 

          या व्यासपीठा चे संस्थापक हे भारतीय असून यामध्ये गुंतवणूक आणि व्यापार करणे अगदी सरळ आणि फार सोपे आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आपले पैसे त्यामधे गुंतवू शकता. 

Cryptocurrency चे फायदे 

        आता पर्यंत आपण crypto currency kay आहे हे जाणून घेतले व त्या मधे गुंतवणूक कशी करावी हे देखील पाहिले. आता याच cryptocurrency चे फायदे विस्तारित रुपात कळवून घेऊयात. 

         आपण जाणतो की कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात तसेच या crypto currency चे देखील आहे. याचे काही फायदे आणि तोटे सुद्धा आहेत, ते नेमके कोणते तेच बघणार आहोत आता आपण. सध्या आपण crypto चलनाचे फायदे पाहुयात. Crypto हे चलन असल्या कारणाने या मध्ये फसवणूक होण्याचे शक्यता खूप कमी आहे. जेव्हा तुमच्या कडे पुरेसे धन उपलब्ध असेल तेव्हा crypto मध्ये गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरताना आपण बघतोय कारण त्याच्या किमिती मध्ये वाढ खूप जलद होताना सुद्धा दिसतेय. बहुतेक crypto चलनाचे वॉलेट उपलब्ध आहेत त्यामुळे ऑनलाईन खरेदी, पैश्याचे व्यवहार अगदी सुलभ अन सोपे झाले आहेत. शिवाय कोणतेही प्राधिकरण crypto वर नियंत्रण ठेवत नाही ज्यामुळे नोटाबंदी आणि चलन अवमूल्यन यांसारखा कोणताही धोका नाही. Crypto चलनाचा सर्वात जास्त फायदा त्या लोकांसाठी झाला आहे ज्यांना स्वतः चे पैसे लपवायचे आहेत. Crypto चलन हे पूर्णपणे सुरक्षित आहे त्यासाठी तुमच्याकडे फक्त प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे, कारण असे चलन Blockchain वर आधारित आहे. 

Cryptocurrency चे तोटे

           प्रथम, क्रिप्टोकरन्सीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे कोणतेही त्याचे भौतिक स्वरूप अस्तित्वात नाही, कारण ते छापले जाऊ शकत नाही. म्हणजे या चलनाच्या नोटा छापल्या जाऊ शकत नाहीत किंवा कोणतेही बँक खाते किंवा पासबुक जारी करता येत नाही. कोणताही कागदी पुराव्याची कमतरता या मध्ये दिसून येते.

या चलना वर कोणत्याही देशाचे किंवा संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कधी कधी त्याच्या किमती मधे खूप मोठी घसरण होते, त्यामुळे crypto चालना मधे गुंतवणुकीचा धोका येथे अधिक वाढतो. याचा वापर शस्त्रास्त्र व्यापार, अंमली पदार्थांचा पुरवठा, काळाबाजार इत्यादी गैव्यवहार करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो.  Blockchain हॅक करणे तितके सोपे, हे संपूर्ण रित्या सुरक्षित जाती असले तरी हे हॅक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामधे जर तुमच्याकडून एखादा व्यवहार चुकून झाला तर तो तुम्हाला वापस घेता येत नाही त्यामुळे तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते. 

Advertisement
1 Comment

1 Comment

  1. Pingback: IPO म्हणजे काय ? | What is IPO in Marathi? - Apali Yojna

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.