Connect with us

टेक

Google meet काय आहे ?व कसे वापरायचे ?, Google meet mobile वर वापरायचे ?  

Published

on

Google meet काय आहे ? कसे वापरायचे ?, meet काय आहे व कसे वापरायचे ?,google meet kay ahe in marathi

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आपण सर्वांनी तब्बल दोन वर्ष लॉकडाऊन चा सामना केला आहे. यामध्ये शाळा, कॉलेज बंद, शासकीय कार्यालय सर्व बंद होते. या काळात संपर्काचे एक साधन किंवा माध्यम म्हणून ऑनलाईन मीटिंग, विविध कार्यशाळा, वेबिनार, उदघाटन ,उद्बोधन मार्गदर्शन व्याख्याने  घेण्यासाठी वर्षभरात Zoom , Google Meet या video communication , video conferencing द्वारे व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधण्याचे विविध व्यासपीठ समोर आले. 

             आजच्या लेखात यापैकी एका व्यासपीठावरील माहिती आपण घेणार आहोत म्हणजेच Google meet काय आहे ? हे बघणार आहोत. 

Google meet काय आहे ?

      Google meet हे Google ने विकसित केलेले Google meet video conferencing सेवा आहे. ज्याद्वारे आपण व्हर्च्युअल पध्दतीने online classes , meetings , group online discussion , webinar इ. कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजेच आपल्याला प्रतक्षात त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. या मुळे social distancing चा नियम देखील पाळला जात होता व कामे अधिक परिणामकारक होऊ लागली होती. सध्या ही या प्रणालीचा वापर संपूर्ण जगभरात केला जातो आहे. 

Google meet वर नोंदणी कशी करावी ?

         Google meet वर नोंदणी करण्यासाठी वेगळे खाते वगैरे उघडण्याची आवश्यकता नाही. ज्या लोकांचे गूगल अकाऊंट आहे ते सर्व लोकं google meet वापरू शकतात. बहुतेक सर्व लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत आणि बहुतेक वापरकर्ते हे अँड्रॉइड प्रणालीवर आधारित च मोबाईल्स वापरतात, त्यांच्या सर्वांकडे गूगल अकाऊंट असतात. त्याद्वारे च आपण youtube , google photos , Gmail वापरत असतो. 

         Google meet आपल्या मोबाईल वर वापरण्यासाठी आपल्याला गूगल अकाऊंट sign up करावे लागेल. म्हणजेच स्वतः चा gmail id आणि पासवर्ड प्रविष्ट करून sign in करावे लागेल. यामध्ये आपण Gmail app Or Google meet app च्या  माध्यमातून Google meet वापरू शकता. यासाठी आपण Play store मधून Google Meet app Download करून घ्या. किंवा मोबाईल मध्ये Gmail Default app असते. त्या माध्यमातून sign in करा.

          आपण जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वरून google meet sign in करू इच्छित असाल तर कोणताही वेब ब्राउझर उघडा आणि त्यामधून गुगल sign in करा. 

Google meet बद्दल काही खास उपयुक्त गोष्टी

 • ज्या लोकांचे गूगल अकाऊंट आहे त्यापैकी कोणीही google meet मध्ये सहभागी होऊ शकते. 
 • एका वेळी किमान 100 लोकांना ह्या मीटिंग मध्ये उपस्थित राहता येते. 
 • व्यवसाय, शाळा आणि इतर संस्था जास्तीत जास्त २५० पर्यंत अंतर्गत किंवा बाह्य सहभागींसोबत ऑनलाइन मीटिंग, वेबीनार आपण करू शकतो.
 • प्रत्येक मीटिंग ही 60 min. पर्यंत चालू शकते. 
 • जेव्हा मीटिंग मध्ये कोणी इंग्लिश भाषेत बोलत असेल तर ते जे बोलत आहेत त्याचे text caption स्वरूपात स्क्रीन वर दिसते यालाच live caption सुविधा असे म्हंटले जाते. 
 • विशेषतः Hearing impairment  हे वैशिष्ट दिव्यांग व्यक्ती साठी खूप उपयोगी असते.
 • गुगल मीट मिटिंग किंवा क्लास मध्ये जॉईन होण्यापूर्वी आपणास आपला कॅमेरा सेट करता येतो. म्हणजे अगोदरच आपला view background कसा दिसतो हे पाहता येते. Mic चेक करून कंट्रोल पडताळणी करता येते.
 • Android , iPad , iphone मोबाईल तसेच desktop , laptop या साधनांवर देखील google meet वापरता येते.
 • ज्याने मीटिंग host केली असेल अर्थात ज्याने मीटिंग सुरू केली असेल त्यांना Mute ,unmute , remove करणे , share स्क्रिन कंट्रोल करता येणे अशे काही अधिकार सुद्धा मिळतात.
 • Google meet वर मीटिंग चालू असताना chat सुद्धा करता येते. 

गुगल मीट मिटिंग कशी शेड्युल करावी? 

 • Play store ॲप मधून Google Meet app download करा.
 • गुगल मीट ॲप ओपन केल्यानंतर स्वतः चा Gmail id टाकून sign in करा.
 • Welcome to meet – असा संदेश स्क्रीन वर आल्यावर continue बटणावर क्लीक करा.
 • स्टोरेज ,रेकॉर्डिंग अश्या परमिशन मागितल्या जातील त्याला allow करा.
 • Gmail app मधून वर ज्या पद्धतीने सांगितलेल्या स्टेप follow करा.

गुगल मीट मिटिंग मध्ये जॉईन कसे व्हावे?

        Google meet वर join होण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या कडे एखादी लिंक आली असेल त्या वर क्लिक करून आपण डायरेक्ट मीटिंग मध्ये उपस्थित राहू शकता. तेथून आपण video set करा. Mic -mute ,unmute व्यवस्थित चेक करून join व्हा.

किंवा

           Google meet ॲप ओपन करून Google meet meeting code घेऊन join with a code या ऑप्शन ला क्लीक करून code टाका आणि जॉईन व्हा.उदा. cdc-yxds-bry अशा पध्दतीने कोड असेल.

         आम्ही आशा करतो की Google Meet  काय आहे ? या विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील. अशा आहे सर्वांनी ही पोस्ट अंत पर्यंत आवश्य वाचली असेल. जर ही पोस्ट तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर आपल्या संबंधित लोकांसोबत नक्की शेअर करा. 

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.