Connect with us

बिझनेस आयडिया

ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय | gramin udyog information in marathi

Published

on

ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय(gramin udyog information in marathi) ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा? ग्रामीण भागात करता येणारे व्यायसाय कोणते? 

ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा? हा सर्रास कानावर येणारा प्रश्न आहे

जर तुम्हाला ही हाच प्रश्न पडत असेल किंवा तुम्हीही इच्छुक असाल व्यवसाय करण्यास पण ग्रामीण भागात कोणते व्यवसाय करावे हे माहिती नाहीत, किती गुंतवणूक लागेल, मार्केटिंग skills माहिती नाहीत, यापूर्वीचा कोणताही अनुभव नाही असे अनेक प्रश्न आज आपल्या समोर आहे. ग्रामीण भागात राहत असल्या मुळे किंवा बाहेरच्या लोकांशी व बाजारपेठांशी कमी संपर्क असल्या अभावी हे प्रश्न नवीन समस्या बनून समोर येतात.gramin udyog information in marathi. 

तुम्हाला तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात सुरू करता येतील असे भरपूर व्यवसाय आहेत. तुमचा गाव बाजारपेठेचे ठिकाण असेल किंवा परिसरातील एक महत्त्वाचं ठिकाण असेल किंवा तुमच्या परिसरात असा एखाद गाव असेल तर अशा ठिकाणी तुम्ही खूप सारे स्थानिक स्थरावर चालणारे रिटेल किंवा सर्व्हिस आधारित व्यवसाय सुरू करू शकता.             

 सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे ह्या पोस्ट च्या मार्फत आपल्याला देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल आणि अशा आहे की तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचाल. 

ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय 

 ग्रामीण भागात कमी गुंतवणूक मधे सुरू करता येईल अश्या काही व्यवसायांची माहिती बघुयात. 

ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय

कोंबडी पालन

जर तुमचा जन्म शेतकरी परिवारात झाला आहे तर तुमच्या शेती सोबत कोंबडी पालन हा व्यवसाय तुम्हाला खूप फायदा मिळवून देऊ शकणारा व्यवसाय आहे. तसेच ग्रामीण भागात हा व्यवसाय खूप प्रमाणात चालतो. मुबलक पर्यावरण असल्या कारणाने हा व्यवसाय आगदी सुलभ मानलं जाऊ शकतो. 

या व्यवसायात सुरुवातीला तुम्हाला फक्त जन्म झालेल्या काही कोंबडी चे पिल्ले विकत घ्यायचे आहेत. त्या पिलांना तुम्हाला 4 ते 5 महिने सांभाळायचे आहे. त्यांना चांगले खाद्य देऊन मोठे करायचे, त्यांची देखभाल करावी लागेल. या कालावधीत तुम्हाला कोंबड्यांना अँटी – वासिन चे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. विशिष्ठ कालावधी नंतर तुम्ही हे इंजेक्शन देऊ शकता. 4-5 महिन्यांच्या kalvadhi नंतर पिल्ले मोठे झाले की ते अंडे देऊ शकतील. हे अंडे विकून सुद्धा तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. या कोंबड्या तुम्ही मार्केट मध्ये चांगल्या किमितीत विकू देखील शकता.  हा व्यवसाय ग्रामीण भागात यशस्वी होऊ शकतो आणि तुम्ही शेती सोबत ह्या व्यवसायात देखील खूप नफा मिळवू शकता. 

गोबर गॅस बनवण्याचा व्यवसाय

ग्रामीण भागात चालणार आणि बहुतेक कमी लोकांना माहिती असणारा पण खूप नफा मिळवून देणारा आणखीन एक व्यवसाय म्हणजे गोबर गॅस बनवणे. 

ग्रामीण भागात शेणाचा उपयोग भरपूर ठिकाणी विविध प्रकारे केला जातो शिवाय त्याची उपलब्धता ही सहज आहे. याच शेणाचा उपयोग गोबर गॅस बनवण्यासाठी ही केला जातो आणि ह्याच कामाला व्यवसायात रूपांतर करता येईल. ग्रामीण भागात विद्युत ऊर्जा आणि LPG गॅस ची कमारता खूप असते. या व्यवसायासाठी तुम्हाला फक्त शेणाची गरज असणार आहे आणि जागा छोटी असो किंवा मोठी अगदी पूरक अश्या जागेत सुद्धा हा व्यवसाय केला जाऊ शकतो. हा एक सर्वोत्कृष्ट व्यवसाय म्हणून ठरू शकतो आणि गरज असल्या मुळे ह्या मधे तुम्ही तुमचा नफा ही मिळवू शकता. 

शेळी पालन व्यवसाय : 

ग्रामीण भागात हा व्यवसाय सर्वत्र आढळणारा जरी असला तरी सुद्धा ह्या वयसायात नफा हा चांगला मानलं जातो म्हणूनच तर आपल्याला जास्त ठिकाणी हा व्यवसाय चालताना दिसतो. या व्यवसाय साठी तुम्हाला शेळीच्या जाती बद्दल व्यवस्थित आकलन करून, कोणती जात चांगली आहे हे माहिती करून घेतलं की त्यानंतर फक्त तुम्हाला शेळीच्या पिल्लांना खरेदी करण्याचा खर्च येऊ शकतो.  तुम्ही तुमच्या हिशोबा नुसार गुंतुवणक करू शकता. व्यवस्थित एखादे छत आणि त्यांना लागणारे खाद्य आणि त्यांची देखभाल एवढं करून तुम्ही त्यांना वाढवू शकता. 

जेव्हा हे पिल्ले मोठी होतील तेव्हा त्यांची चांगली किंमत ठरवून तुम्ही ते विकू देखील शकता, किंवा अनेक ठिकाणी शेळीच्या दुधाचा व्यवसाय ही करतात. 

ब्युटी पार्लर

आजच्या काळात सौंदर्याला किती महत्व आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आज काही ग्रामीण भागातून महिला आपल्या ग्रामीण भागातून जवळच्या एखाद्या शहरात जातात. जर तुम्ही हा व्यवसाय तुमच्या ग्रामीण भागातच सुरू केला तर हा व्यवसाय अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय मानला जातो. घरात काम करताना पार्ट टाईम मधे सुद्धा हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्युटी पार्लर चा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही आवश्यक ती ब्युटी टिप्स आणि मेकप ची साधारण  माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या शहरात या बद्दल ची ट्रेनिंग घेऊन किंवा याचे क्लासेस सुद्धा उपलब्ध आहेत. ब्युटी पार्लर च व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 20 हजार ची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ही गुंतवणूक करून तुम्ही प्रती माह 10-15 हजार सहज कमवू शकता. 

कचरा व्यवस्थापन

आजकाल ग्रामीण भागात कचरा व्यव्थापनाबाबत जागरूकता दिसून येत आहे आणि अश्याच संधीचा फायदा घेत तुम्ही हा व्यवसाय म्हणून सुद्धा स्थापित करू शकता. या मधे खूप कमी लोक, भांडवल सुद्धा कमीच लागते. शिवाय कचऱ्याला तुम्ही दुचाकी किंवा तीनचाकी वाहनावर किंवा एखादी गाडी भाड्याने घेऊन देखील व्यवस्थापित करू शकता. 

कचऱ्याच्या व्यवसायात जवळ पास 50% – 60% पर्यंत चे समास तुम्ही काढू शकता. 

small business ideas in marathi

एखादे हॉटेल सुरू करणे :

  हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही हे तुम्ही खूप लोकांकडून भरपूर वेळा ऐकलं असेल आणि हे तितकेच खरही आहे. चहा, भेळ, मिसळ, भजे, वडापाव, समोसे इ. सारख्या भरपूर खप असणाऱ्या खाद्य पदार्थांचे हॉटेल सुरू करा. खाणारी तोंडे कधी बंद होणार नाहीत आणि हेच कारण आहे की हा अमरण व्यवसाय तुम्हाला भरपूर नफा मिळवून देण्यास फायद्याचा ठरेल.  

यासाठी गुंतवणूक 25-30 हजार पेक्षा जास्त लागत नाही. स्टँडवर, गर्दीच्या ठिकाणी ज्या वडापाव च्या गाड्या दिसतात त्या साठी केवळ 5 हजार इतकेच भांडवल लागते. 

कपड्यांचे दुकान :

ग्रामीण भागाचा विचार करता कपड्यांचे दुकान हा देखील एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. बाजारपेठेच्या ठिकाणी या व्यवसायाला चांगले मार्केट मिळते. सुरत, मुंबई, अहमदाबाद, बडोदा यांसारख्या ठीकणावरून होलसेल दरात कपडे आणावेत, व्यवस्थित जागा बघून स्वतः चे कपड्यांचे दुकान थाटावे. ग्राहकांची गरज पूर्ण झाली तर ग्राहकांची कमतरता कुठेच नाहीये. आजही ग्रामीण भागातील कपड्यांचे मार्केट काही ठराविक लोकांच्या च हातात आहे. हे मार्केट तुम्ही तुमच्या कडे वळवू शकता आणि कपड्यांचे दुकान हा व्यवसाय ही ती संधी ठरू शकते. 

किराणा दुकान सुरू करू शकता :  

किराणा व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही. छोटे असे एखादे किराणा दुकान जरी सुरू केलेत तरी त्यातून खूप चांगले प्रॉफिट मिळू शकते. 

बेकरी टाकू शकता : 

 केक, पाव, ब्रेड, खरी, toast, बिस्कीट आणखी बरेच पदार्थ या व्यवसाय अंतर्गत येतात आणि ते तुम्ही विकू शकता. हे पदार्थ तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या मोठ्या बेकाऱ्या आहेत त्यांच्या कडून होलसेल किमतीत हे पदार्थ घेऊन स्थानिक बाजारात विका ज्यातून तुम्हाला भरपूर प्रॉफिट मिळू शकते. 

वाहन दुरुस्ती दुकान : 

वाहन दुरुस्तीचे काम देखील चांगला नफा मिळवून देऊ शकतो. वाहन दुरुस्ती चे काम शिकण्यासाठी आसपास च्या मोठ्या गॅरेज मध्ये एक वर्ष काम करून तेथून चांगला अभ्यास व अनुभव प्राप्त करून तुम्ही तुमचे स्वतः चे वाहन दुरुस्ती चे दुकान सुद्धा टाकू शकता. ट्रॅक, कमर्शिअल वाहनांचे दुरुस्ती काम मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्व्हिस सुद्धा चांगला व्यवसाय आहे. यामध्ये सुद्धा प्रॉफिट चांगले कमवू शकता. 

साहित्य भाड्याने देणे :

 ग्रामीण भागात लग्न, साखरपुडा, एखादे लग्न,साखरपुडा, जागरण गोंधळ किंवा देवाचा भंडारा सारखे कार्यक्रम वारंवार होत असतात. या सर्व कार्यक्रमाला लागणारे साहित्य म्हणजे सर्व भांडे, मंडप, डेकोरेशन चे सामान, जनरेटर किंवा लाइट च्या माळा यांच्या सारख्या वस्तू तरी सर्व सारखेच असतात, ह्या वस्तू तुम्ही भाड्याने देऊ शकता. हा व्यवसाय लहान जरी वाटत असला तरी चांगला नफा मिळवून देणारा आहे.  ह्या व्यवसायात गुंतवणूक फक्त एकदाच करावी लागेल. 

ग्रामीण भागात केले जाणारे व्यवसाय

  • मधमाशी पाळणे :  

मध अधिक उपयुक्त असे उत्पादन आहे. प्राचीन काळापासून मधाचा उपयोग होत आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये मधाचे खूप महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. शिवाय कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मध  बहुतेक सर्व लोकं खरेदी करतातच. तर असे हे उपयोगी मध आपल्याला मधमाशी मुळेच मिळते.

मध पासून नफा व्यतिरिक्त, चांगले अतिरिक्त कमाई मधमाशी निवड आणते. अश्या ह्या लहान व्यवसायासाठी काही गुंतवणुकीची गरज लागते. तरीही मधमाशी पाळणे हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो.

  • डाळ मिल : 

हा व्यवसाय केवळ ग्रामीण भागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही करता येतो. दाळमिल  मध्ये तूर, हरभरा, उडीद, मसूर वाटणे किंवा कुठल्या प्रकारचे द्विदल धान्य घेऊन तुम्ही त्याच्या पासून डाळ तयार करू शकतात आणि एकदा का ही प्रक्रिया झाली की ह्याच वाटलेल्या डाळी शेजारच्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन तिथे तुम्ही सहज रित्या विकू शकता. या व्यातरीक्त तुम्ही ह्या डाळी ऑनलाईन सुद्धा विकू शकता. 

आजूबाजूचे शेतकरी असतील कोणी तूर उत्पादक असेल कोणी उत्पादन कोणी हरभरा उत्पादन असतील कोणी उडीद उत्पादक किंवा कुठल्या प्रकारचे उत्पादन करत असेल तर त्यांच्याकडून तुम्ही तो कच्चामाल मागू शकतात. यानंतर तुम्ही हाच कच्चामाल घेऊन तुम्ही तुमच्या मिल मध्ये यावर प्रक्रिया करू शकता. या नंतर तुम्हाला तयार झालेल्या नवीन मालाची विक्री करायची आहे. 

  • मसाला मेकिंग मशीन : 

जर तुम्हाला माहिती नसेल तर माहीत करून घ्या की भारत-पाकिस्तान, सौदी अरब, मॉरिशियस, आणि दक्षिण आफ्रिका या देशातील दररोजच्या जेवणात मसाल्यांचे पदार्थ किंवा मसाला युक्त काळीमिरी, सुके, खोबरे, तेज पान विलायची त्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या, नागकेशर, खसखस, जायपत्री, चक्रफुल, मसाल्यांचे पदार्थ आहेत. हेच पदार्थ वापरण्यात येतात आणि त्यातूनच मग ते सुद्धा भाजी तयार करतात आणि एक चांगल्या प्रकारचा स्वाद त्या दिवसाच्या भाजीला दिला जातो. 

भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला निर्यात करणारा देश आहे. तर असा हा मसाला मेकिंग उद्योग व्यवसाय तुम्ही मशीन घेऊन सुरू करू शकतात. कमीत कमी गुंतवणूक  आणि जास्तीत जास्त नफा.  अद्रक लसूण कांदा यांची पेस्ट तयार करणे हा एक लघु उद्योग होऊ शकतो. तुम्ही तुमचे हेच पदार्थ वेगवेगळ्या परिसरात, गावात, शहरात, राज्यात किंवा कोणत्याही देशात विकू शकता. 

  • चिप्स मेकिंग : 

संपूर्ण जगात चिप्स हा प्रकार किती प्रसिद्ध आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. चिप्स हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध स्नॅक्स पैकी एक आहे हे मानायला सुद्धा हरकत नाही.  चिप्स ह्या मध्ये सुद्धा खूप प्रकार आहे. केवळ बटाटा चिप्स हा फक्त एक चिप्स च प्रकार नसून खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि flavour चे चिप्स आपण सर्वांनी चाखले आहेत.

याच्यामध्ये चिप्स मध्ये बटाटा पासून तयार होणारे  चिप्स  असतील किंवा केळी पासून तयार होणारे चिप्स, हे सर्वत्र खूप प्रसिद्ध आहेत तसेच खूप आवडीने खाल्ले जातात. 

या व्यवसायासाठी चिप्स मेकिंग मशीन मिळते त्याद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात कमी श्रेणी वर करू शकता. 

सुरुवातील कमी गुंतवणूक करून तुम्ही ह्या व्यासायला भव्य दिव्य करून तुम्ही विचार सुद्धा केला नसेल एवढा नफा मिळवू शकता. 

  • पोहा मिल : 

पोहा हा किती सुप्रसिद्ध नाश्ता आहे हेही आपण जाणतो. तुम्ही आम्ही किती तरी वेळा याची चव घेतली आहे. तसेच या पासून बनवण्यात येणाऱ्या प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आपल्या आवडीच्या आहेत. 

पोहा मिल उद्योग व्यवसाय असा व्यवसाय आहे की तुम्ही तो ग्रामीण भागातून सुद्धा सुरू करू शकता जर तुमच्याकडे काच्चा माल उपलब्ध असेल तर तुम्ही त्याच मालापासून चुरमुरे म्हणजेच मुरमुरे सुद्धा तयार करू शकता त्याचबरोबर ते दगडी पोहे किंवा कागदी पोहे, नायलॉन चे पोहे, मक्याचे पोहे असे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे पोहे तुम्ही तयार करू शकतात आणि मार्केटमध्ये  विकू करू शकतात. हा सुद्धा एक लघु उद्योग म्हणून सुरू करून तुम्ही या उद्योगाला मोठे करू शकता.

तर आपण ह्या पोस्ट मध्ये पाहिले की ग्रामीण भागात कोणते व्यवसाय करावे? त्यासाठी मुबलक भांडवल किती गुंतवणूक करावी, व्यवसायासाठी काय काय लागु शकते, कोणत्या व्यासायातून तुम्ही किती नफा कमवू शकता ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्या. 

 तर आपण ह्या पोस्ट मध्ये पाहिले की ग्रामीण भागात कोणते व्यवसाय करावे? त्यासाठी मुबलक भांडवल किती गुंतवणूक करावी, व्यवसायासाठी काय काय लागु शकते, कोणत्या व्यासायातून तुम्ही किती नफा कमवू शकता ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्या. 

व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा. काय विकायचं ठरवा, आणि कामाला लागा.वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अशा आहे की आपल्याला ह्या पोस्ट मधील माहिती समजली असेल. अजून काही व्यवसाय आहेत का, जे ग्रामीण भागात चांगले फायदेशीर ठरू शकतात? आम्हाला खाली कॉमेंट करून कळवाAdvertisement
1 Comment

1 Comment

  1. Pingback: Business ideas in marathi, बिनभांडवली व्यवसाय, कमी गुंतवणूकीचे व्यवसाय मराठी - Apali Yojna

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.