Connect with us

टेक

NFT म्हणजे काय ?,What is NFT in Marathi, 

Published

on

What is NFT in Marathi, NFT Full form,  NFT म्हणजे काय ?

21 व्या शतकात कमाई करण्याचे मार्ग खूप विस्तारित आणि बदलले आहेत. जगभरात गेल्या काही गोष्टीत सर्वच बाबतीत मोठे बदल झाले आहे. गुंतवणूक करण्याची पद्धत ही बदलली आहे. यामध्ये च NFT हा शब्द सध्या खूप चर्चेत आहे.  NFT मधे जगभरातील खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती आपली पसंती दाखवत आहेत, तसेच यात अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान सहित अनेक क्रिकेटपटूंचा समावेश आहे.  हे NFT नक्की काय आहे ? NFT चा अर्थ काय होतो, What is NFT in marathi  हे जाणून घेऊया. 

NFT Full FormNFT म्हणजे काय ?

 N – Non F – Fungible T – Token (नॉन-फंजिबल टोकन)

 NFT (Non Fungible Token) ही एक प्रकारची डिजिटल संपती आहे. याला हताळण्या साठी सध्या ब्लॉक चेन तंत्रण्यानाचा वापर केला जात आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने जीआयएफ, फोटो, व्हिडिओ क्लिप्स, पेटिंग व अन्य डिजिटल संपत्तीचा मालकी हक्क निश्चित होतो.  या सर्व गोष्टी देखील एका प्रकारच्या डिजिटल संपती असल्या मुळे याची खरेदी – विक्री देखील डिजिटल स्वरूपात च होते. याची खरेदी-विक्री क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होईल, थोडक्यात तुम्ही तुमच्या डिजिटल वस्तूंचा लिलाव करू शकता.

NFT खरेदी विक्री कशी होते

आता पर्यंत आपण What is NFT in marathi विषयी माहिती घेतली, आता जाणून घेऊयात की नेमकी याची खरेदी विक्री होते तरी कशी ?

        NFT (Non Fungible Token)  च्या मालकी हक्कासाठी एक ownership certificate मिळते. ज्या व्यक्तीची एखादी वस्तू, आर्ट, फोटो, व्हिडिओ इत्यादी या कॅटेगरीमध्ये येतात, त्यांच्या मालकीचे अधिकार सर्टिफिकेटद्वारे त्या व्यक्तीकडे जातात. Crypto art किंवा ऑनलाईन गेमिंग साठी सुद्धा NFT चा वापर केला जाऊ शकतो.NFT मधे एंट्री झाल्या नंतर कोणताही बदल किंवा छेड – छाड करता येत नाही. NFT साठी केवळ डिजिटल हेच माध्यम आहे, हे सध्या Blockchain Technology वर काम करते. 

 

NFT क्या माध्यमातून कशी होते कमाई 

       आत्ता पर्यंत आपण What is NFT in marathi पाहिलं व NFT ची खरेदी विक्री देखील पहिली. आता आपण जाणून घेऊयात की NFT क्या माध्यमातून कमी कशी केली जाऊ शकते. NFT क्या माध्यमातून कमाई करण्यासाठी दोन मार्ग आहेत पाहिलं मार्ग म्हणजे गेमिंग आणि दुसरा मार्ग म्हणजे गुंतवणूक. 

गेमिंगद्वारे :   

 NFT क्या माध्यमातून कमाई करण्या साठी गेमिंग हे सर्वाधिक कमाई करून देण्याचं मार्ग आहे असा मानलं जात आहे. गेमिंग सेगमेंट मधे याला अती महत्त्वाचे मानले जात आहे.  या द्वारे कमाई देखील करत आहेत. समजा, तुमच्याकडे एक व्हर्च्यूअल रेस ट्रॅक आहे,तुमच्याकडे असलेला हाच एक व्हर्च्यूअल रेस ट्रॅक जर दुसऱ्या प्लेअर्सला वापर करण्यासाठी दिल्यास तुम्हाला पैसे मिळतील.

गुंतवणूक :    

गुंतवणूकदारांना NFT वर कमाई साठी थोडी जास्त वाट पहावी लागू शकते. बाजारात एका खास नाण्यासाठी एक विशेष प्रकारची मागणी आहे पण विक्रेताच मात्र तयार नाही विक्री करण्या साठी. 

गुंतवणुकदारांना कमाईसाठी वाट पाहावी लागू शकते कारण एखाद्या दुसऱ्या देशाचे महत्त्वाचे चिन्ह, म्यूझिममधील नाणी इतर व्यक्तींसाठी महत्त्वाची नसू शकतात.  

 

‘Blockchain Technology’ कसे काम करते ?

What is NFT in  Marathi पहिल्या नंतर, NFT ज्या technology वर काम करते त्याचे विश्र्लेशन जाणून घेऊयात

        क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटीसोबत गेल्या काही वर्षात ब्लॉकचेन टेक्नोलॉजी हे नाव देखील विशेष चर्चेत आहे.  जेथे केवळ डिजिटल करन्सी नाही तर कोणत्याही वस्तूचा डिजिटल माध्यमात रेकॉर्ड ठेवला जाऊ शकतो तो म्हणजे च  ब्लॉकचेन टेक्नोलॉजी चा प्लॅटफॉर्म,एनएफटी हे ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवरच काम करते. ब्लॉकचेन एक डिजिटल लेजरच आहे. तर  बिटक्वाइंन हे एक डिजिटल माध्यम आहे, ज्याद्वारे आपण काही वस्तूंची खरेदी व विक्री करू शकतो..

NFT चा इतिहास

 NFT (Non Fungible Token) सर्व प्रथम Kevin McCoy आणि Anil Dash यांच्या  द्वारे 2014 सली तयार करण्यात आले. 

हे Ethereum ब्लॉकचेन टेक्नोलॉजीवर काम करते. खास हटके फोटो-व्हिडिओ जे सर्वात वेगळे आहेत, एखादे विशिष्ट असे खास आर्ट ज्याचे मालकी हक्क एखाद्या व्यक्तीकडे आहेत याचं मालकी हक्काला Non Fungible Token असे नाव देण्यात आले व यालाच NFT म्हणातात. आज जगभरात लोकं  फोटो, जीआयएफ, व्हिडिओ, पेटिंग यांची खरेदी विक्री करून NFT क्या माध्यमातून कोट्या वधिंची कमाई करत आहेत.

NFT सोबत चे भारतीय भविष्य

       What is NFT in Marathi ह्या बद्दल सर्व माहिती घेतल्या नंतर NFT सोबत भारतीय भविष्य कसे असेल याचा थोडक्यात आढावा घेऊयात. 

         जगभरात चर्चित असलेल्या  NFT सोबत भारतीय भविष्य कसे असेल या बद्दल वेगवेगळी मत आहेत, याचं कारण असं की ही खूपच नवीन संकल्पना आहे. ज्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांमध्ये संभ्रम होता त्याच प्रमाणे सध्या  NFT बद्दल ही आहे. तसेच या डिजिटल संपत्ती बद्दल एवढे पैसे कसे खर्च करायचे या बद्दल खूप लोकांच्या मनांत गोंधळ देखील आहे.  भारतात एनएफटी लाँच करण्यासाठी ‘क्रिप्टो एक्सचेंज’ नावाची कंपनी ओळखली जाते. एका रिपोर्टनुसार, Ethereum ब्लॉकचेनमध्ये जारी एनएफटीचे एकूण मुल्य १४.३ बिलियन डॉलर आहे, जे गेल्यावर्षी जवळपास ३४० मिलियन डॉलर होते. सलमान खान, अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हे देखील एनएफटी कलेक्शन आणण्याची शक्यता आहे. अश्या प्रकारे बहुतांश सकारात्मक दिसत असलेल्या NFT च भविष्य सध्या तरी सुरक्षित दिसत आहे

Advertisement
1 Comment

1 Comment

  1. Pingback: IPO म्हणजे काय ? | What is IPO in Marathi? - Apali Yojna

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.