5G नेटवर्क काय आहे, 5G म्हणजे काय? भारतात कधी होईल याची सुरुवात?

5G चा फुल फॉर्म होतो Fifth Generation म्हणजेच पाचवी पिढी. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशन ची पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते.

सोबतच वायरलेस नेटवर्क ची सुध्दा पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते, ही सेवा 2G , 3G , 4G पेक्षा अधिक वेगवान आहे.

5G नेटवर्क इंटरनेट सुविधा मध्ये आपल्याला स्वस्त दरात उच्च सुविधा, कमी वेळात अधिक वेग आणि आणि इंटरनेट वर कार्यरत सर्व गोष्टींचा वेगही वाढणार. ह्याची स्पीड 20 Gbits असणार आहे,

म्हणजेच 1 HD चित्रपट डाउनलोड करण्यासाठी 10 – 20 सेकंदाचा कालावधी लागणार आहे, सोबतच अपलोडिंग ची स्पीड सुध्दा जास्त असणार आहे.

5G नेटवर्क मुळे आपल्याला आपल्या मोबाईल वर एका सेकंदात 20 गिगाबाईट्स इतका स्पीड भेटणार आहे. तसेच स्लो इंटरनेट सुविधा पासून सुटका मिळेल.

सध्या इंटनेटवर असलेल्या खूप हेवी ट्रॅफिक पासून देखील सुटका मिळणार आहे. यासाठी मोबाईल कंपन्यांना आपल्या सिस्टीम मध्ये बदलाव करून 5G

सारख्या वायरलेस तंत्रज्ञानासाठी त्यांच्या मोबाइल डिव्हाईस ना अपग्रेड करावे लागेल. आणि मोबाईल कंपन्यांना ही एक प्रकारे स्पर्धा असणार आहे.