Connect with us

टेक

5G नेटवर्क काय आहे, 5G म्हणजे काय? भारतात कधी होईल याची सुरुवात? 

Published

on

5g mahnje kay in marathi

5G नेटवर्क काय आहे, 5G म्हणजे काय?,5g mahnje kay in marathi,5g mahnje kay?,

आज आपण ज्या जगात जगात आहोत त्या जगात इंटरनेट सुविधा ही सर्वसामान्य गोष्ट आहे आणि आपण आपले जीवन इंटरनेट शिवाय शून्य आहे तसेच हे जग ही सध्या इंटरनेट क्या सुविधेशिवाय शून्य च आहे. सर्वात आधी जशी 2G इंटरनेट सुविधा वापरत आली. 2G नंतर 3G इंटरनेट आणि सध्या आपण जी सेवा वापरत आहोत ती 4G इंटरनेट सुविधा आहे. त्याच प्रकारे इतर देशात 5G इंटरनेट सेवा किंवा काही काही देशात 7G इंटरनेट सेवा सुद्धा आहे. 

           आपल्याला माहिती च असेल की जेव्हा भारतात 4G इंटरनेट सेवा आली होती तेव्हा सर्वांना 4G हँडसेट मोबाईल घ्यावा लागला होता, पण जेव्हा भारतामध्ये 5G इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यास आपल्याला मागच्या सारखे हँडसेट बदलवण्याची आवश्यकता भासेल का? तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत, की 5G म्हणजे काय आणि भारतामध्ये हे कधी उपलब्ध होणार आहे. तर चला पाहूया.. 5G म्हणजे काय आणि भारतात कधी होईल याची सुरुवात – 

5G नेटवर्क काय आहे ? 

             5G चा फुल फॉर्म होतो Fifth Generation म्हणजेच पाचवी पिढी. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशन ची पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते. सोबतच वायरलेस नेटवर्क ची सुध्दा पाचवी पिढी म्हणून ओळखल्या जाते, ही सेवा 2G , 3G , 4G पेक्षा अधिक वेगवान आहे.

              5G नेटवर्क इंटरनेट सुविधा मध्ये आपल्याला स्वस्त दरात उच्च सुविधा, कमी वेळात अधिक वेग आणि आणि इंटरनेट वर कार्यरत सर्व गोष्टींचा वेगही वाढणार. ह्याची स्पीड 20 Gbits असणार आहे, म्हणजेच 1 HD चित्रपट डाउनलोड करण्यासाठी 10 – 20 सेकंदाचा कालावधी लागणार आहे, सोबतच अपलोडिंग ची स्पीड सुध्दा जास्त असणार आहे.

             5G नेटवर्क मुळे आपल्याला आपल्या मोबाईल वर एका सेकंदात 20 गिगाबाईट्स इतका स्पीड भेटणार आहे. तसेच स्लो इंटरनेट सुविधा पासून सुटका मिळेल. सध्या इंटनेटवर असलेल्या खूप हेवी ट्रॅफिक पासून देखील सुटका मिळणार आहे. यासाठी मोबाईल कंपन्यांना आपल्या सिस्टीम मध्ये बदलाव करून 5G सारख्या वायरलेस तंत्रज्ञानासाठी त्यांच्या मोबाइल डिव्हाईस ना अपग्रेड करावे लागेल. आणि मोबाईल कंपन्यांना ही एक प्रकारे स्पर्धा असणार आहे. 

भारतात कधी होईल 5G नेटवर्कची सुरुवात? 

         अमेरिकी सारख्या देशांमध्ये ही सेवा जवळ जवळ 2020 च्या अखेरीस च सुरू झाली आहे.  दक्षिण कोरिया सारख्या देशात तर 7G इंटरनेट सुविधा सुद्धा वापरत आली आहे. जगातील अन्य देशात देखील ही सुविधा वापरात आहे. आणि भारतीयांना सुद्धा या सेवेचा लाभ लवकरच घेता येणार आहे. भारतात 5G नेटवर्क ची टेस्टिंग जवळपास पूर्ण होत आली आहे, त्यामुळे ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. 

         भारताच्या दूरसंचार विभागाने या प्लॅन ला सहमती दर्शवत यावर काही पॉलिसी बनविण्याचे ठरविले आहे. सोबतच या विषयी भारतातील दूरसंचार कंपन्या Jio, Airtel. सारख्या कंपनी याविषयी पुढील प्लॅनिंग करत आहेत, एकवेळ नेटवर्क सेट झाल्यानंतर ग्राहकांना 5G चे हँडसेट असलेला मोबाईल असणे गरजेचे असेल आणि त्यांनंतर 5G नेटवर्क स्पीड चा आनंद घेतला जाऊ शकतो. 

           भारतातील टेलिकॉम कंपन्यांना माहिती आहे की सध्या 4G डेटा प्लॅन्स स्वस्त दरात उपलब्ध होता पण त्यानंतर प्रत्येक कंपनीने त्यांच्या डेटा प्लॅन्स मधे वाढ केली आहे. त्यामुळे कोणतीही आता कोणतीही कंपनी 5G नेटवर्क मध्ये निवेश करण्यास मागे पुढे पाहणार नाही. 

म्हणून आपण या सेवेपासून जास्त दूर नाही आहोत. 

5G आल्यानंतर मोबाईल बदलण्याची गरज पडेल का?

   बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की 5G जर भारतामध्ये आले तर मोबाईल हँडसेट बदलावे लागेल का? तर उत्तर असेल कदाचित हो !  

 हो! कारण असा अंदाज आहे की, जेव्हा 4G नेटवर्क नवीन आले होते तेव्हा मोबाईल चे हँडसेट बदलावे लागले होते, त्याचप्रमाणे 5G नेटवर्क आल्यानंतर सुध्दा आपल्याला मोबाईलला बदलावे लागेल, पण अशी सुद्धा आशंका आहे की हे करण्याची ही गरज भासू शकणार नाही ह्या उपायावर बऱ्याच कंपन्या काम देखील करत आहेत. 

तर आजच्या लेखात आपण पाहिले की 5G नेटवर्क काय आहे आणि 5G म्हणजे काय? भारतात कधी होईल याची सुरुवात? 

 आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. 

Advertisement
2 Comments

2 Comments

  1. Pingback: UPI म्हणजे काय? UPI फुलफॉर्म in marathi? UPI कसे वापरावे?  - Apali Yojna

  2. Pingback: Wireless Communication म्हणजे काय? । Wireless Communication कसे काम करते? Apali Yojna

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending

Copyright © 2020 Apali Yojna by The ShubhazzZ Teach.